प्रस्ताव दाखल करा

🌐 Select Website Language

🌟 बी द चेंज फाउंडेशन आयोजित
NATIONAL ENTREPRENEUR AWARDS 2026
राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार २०२६

उद्योग, नवोपक्रम आणि रोजगारनिर्मिती हे कोणत्याही राज्याच्या प्रगतीचे प्रमुख आधारस्तंभ असतात. समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासात उद्योजकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. नव्या कल्पना, जोखीम घेण्याची तयारी, सातत्यपूर्ण मेहनत आणि सामाजिक जबाबदारीची जाण यामुळे उद्योजक केवळ स्वतःचा व्यवसाय उभा करत नाहीत, तर अनेक कुटुंबांचे भवितव्य घडवतात. अशा दूरदृष्टी असलेल्या, प्रेरणादायी आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्याच्या उदात्त हेतूने “बी द चेंज फाउंडेशन” (नोंदणीकृत) तर्फे “राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार २०२६” चे आयोजन करण्यात येत आहे. या पुरस्कारांतर्गत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांकडून प्रस्ताव मागवले जातील. प्राप्त प्रस्तावांची निवड बी द चेंज फाउंडेशनच्या तज्ञ समितीद्वारे पारदर्शक निकषांच्या आधारे केली जाईल आणि निवड झालेल्या उद्योजकांना राज्यस्तरीय सन्मान प्रदान केला जाईल.

🏆 पुरस्कार स्वरूप :
शाल • मानपत्र • आकर्षक ट्रॉफी • गिफ्ट • सन्मानपत्र

🏆 राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार २०२६ – विविध कॅटेगरी

🏆 उत्कृष्ट युवा उद्योजक पुरस्कार 🏆 उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कार 🏆 स्टार्टअप उद्योजक पुरस्कार 🏆 MSME / लघुउद्योग उद्योजक पुरस्कार 🏆 मॅन्युफॅक्चरिंग उद्योग पुरस्कार 🏆 कृषी व अ‍ॅग्रो उद्योजक पुरस्कार 🏆 सेवा उद्योग उद्योजक पुरस्कार 🏆 IT / टेक्नॉलॉजी / डिजिटल उद्योजक पुरस्कार 🏆 सामाजिक उद्योजक पुरस्कार 🏆 नाविन्यपूर्ण (Innovation) उद्योजक पुरस्कार 🏆 ग्रामीण उद्योजक पुरस्कार 🏆 निर्यात / आयात उद्योजक पुरस्कार 🏆 कौशल्य विकास व रोजगार निर्मिती पुरस्कार 🏆 हरित व पर्यावरणपूरक उद्योग पुरस्कार 🏆 आजीवन उद्योजकीय योगदान पुरस्कार 🏆 सर्वोत्कृष्ट स्वयंसेवी संस्था पुरस्कार (NGO)

राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार २०२६ महत्वाच्या लिंक्स

Info PDF
माहितीपत्रक डाऊनलोड करा
Click Here
Online Form
ऑनलाईन प्रस्ताव दाखल करा
Click Here
Payment
नामनिर्देशन शुल्क भरा
Click Here

⭐ राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार २०२६ – वैशिष्ट्ये

Selection Process
पुरस्कार विजेत्यांची पारदर्शक व तज्ञ समितीद्वारे निवड
Digital Records
आलेल्या सर्व प्रस्तावांचे डिजिटल रेकॉर्ड मेंटेनन्स
Online Offline
ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने प्रस्ताव दाखल सुविधा
State Level Selection
संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रांतील उद्योजकांची निवड
Nomination Fees
नामनिर्देशन शुल्क : रु. २५,०००/- मात्र
Dignitaries
उद्योग व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
Organizer
राज्यातील नामांकित सामाजिक संस्था – बी द चेंज फाउंडेशन
Promotion
पुरस्कार विजेत्यांना डिजिटल प्रमोशन व सोशल मीडिया प्रसिद्धी

प्रस्तावासाठी महत्वाच्या आवश्यक अटी व शर्ती

प्रस्तावक हा भारत देशातील उद्योजक असावा.

उद्योग / व्यवसाय किमान १ वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक आहे.

प्रस्तावकाचा उद्योग कायदेशीररित्या नोंदणीकृत असावा (Company Incorporation Certificate / GST / Udyam / MSME / Partnership / Shop Act / NITI Aayog इ.).

कोणत्याही प्रकारची फसवणूक, गंभीर कायदेशीर कारवाई किंवा आर्थिक गैरव्यवहार प्रलंबित नसावा.

प्रस्तावकाने आपल्या उद्योगामार्फत रोजगारनिर्मिती, नवोपक्रम किंवा समाजोपयोगी कार्य केलेले असावे.

प्रस्तावात दिलेली सर्व माहिती व कागदपत्रे स्वयंसाक्षांकित (Self-attested) असणे आवश्यक आहे.

चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास प्रस्ताव अवैध ठरेल.

आवश्यक असल्यास संबंधित कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल.

अंतिम निवडीचा निर्णय बी द चेंज फाउंडेशनच्या तज्ञ समितीचा असेल.

प्रस्तावात नमूद केलेल्या उद्योगाची सत्यता तपासण्याचा अधिकार संस्थेकडे राखीव राहील.

कोणत्याही कारणास्तव चुकीची माहिती आढळल्यास पुरस्कार रद्द करण्याचा अधिकार संस्थेकडे राहील.

📌 विश्वास व पारदर्शकता सूचना

सदर पुरस्कारासाठी घेतलेले नामांकन शुल्क हे पूर्णतः कार्यक्रमाच्या आयोजन व व्यवस्थापनासाठी वापरण्यात येईल. हा उपक्रम ना नफा ना तोटा या सेवाभावी तत्त्वावर “बी द चेंज फाउंडेशन” तर्फे आयोजित करण्यात येत आहे.

उद्योजक हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे कणा आहेत. रोजगारनिर्मिती, नवोपक्रम आणि सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून ते राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात. अशा प्रेरणादायी उद्योजकांचा गौरव करण्यासाठी “बी द चेंज फाउंडेशन” (रजि.) तर्फे
“राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार २०२६” चे आयोजन करण्यात येत आहे.

🏆 राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार २०२६ – विविध कॅटेगरी

अ.क्र. पुरस्काराचे नाव (मराठी) Award Name (English)
1 उत्कृष्ट युवा उद्योजक पुरस्कार Best Young Entrepreneur Award
2 उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कार Best Woman Entrepreneur Award
3 स्टार्टअप उद्योजक पुरस्कार Startup Entrepreneur Award
4 MSME / लघुउद्योग उद्योजक पुरस्कार MSME / Small Scale Industry Entrepreneur Award
5 मॅन्युफॅक्चरिंग उद्योग पुरस्कार Manufacturing Industry Entrepreneur Award
6 कृषी व अ‍ॅग्रो उद्योजक पुरस्कार Agriculture & Agro-Based Entrepreneur Award
7 सेवा उद्योग उद्योजक पुरस्कार Service Industry Entrepreneur Award
8 आयटी / टेक्नॉलॉजी / डिजिटल उद्योजक पुरस्कार IT / Technology / Digital Entrepreneur Award
9 सामाजिक उद्योजक पुरस्कार Social Entrepreneur Award
10 नाविन्यपूर्ण उद्योजक पुरस्कार Innovative Entrepreneur Award
11 ग्रामीण उद्योजक पुरस्कार Rural Entrepreneur Award
12 निर्यात / आयात उद्योजक पुरस्कार Export–Import Entrepreneur Award
13 कौशल्य विकास व रोजगार निर्मिती पुरस्कार Skill Development & Employment Generation Award
14 हरित व पर्यावरणपूरक उद्योग पुरस्कार Green & Environment-Friendly Industry Award
15 आजीवन उद्योजकीय योगदान पुरस्कार Lifetime Achievement in Entrepreneurship Award
16 सर्वोत्कृष्ट स्वयंसेवी संस्था पुरस्कार Best NGO Award

🎥 कार्यक्रमाचे अविस्मरणीय ठळक क्षण (Video Highlights)



राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५

दि. २९ जून २०२५ रोजी शिर्डी, महाराष्ट्र येथे संपन्न.
या प्रतिष्ठित कार्यक्रमात आदर्श शिक्षकांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला असून राज्यभरातील १३०० हून अधिक शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर

उत्कृष्टता पुरस्कार प्रदान समारंभ

हा व्हिडिओ माहितीस्तव म्हणून पहावा! अशाच पद्धतीचा भव्यदिव्य महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२६ घेण्याचा आपल्या संस्थेचा मानस आहे

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६

Mumbai · 18 January 2026

National Ideal Teachers Award 2026 हा Be The Change Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला एक भव्य आणि अत्यंत उत्साहपूर्ण राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळा आहे. हा कार्यक्रम रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथील आरंभ हॉल येथे मोठ्या दिमाखात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास देशभरातील अनेक मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रांतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये देशातील विविध राज्यांतील गुणवंत, कर्तव्यदक्ष आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी तसेच समाजोपयोगी योगदानासाठी गौरविण्यात आले. सर्वांगीण विद्यार्थी विकास, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि सामाजिक कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांद्वारे या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. Be The Change Foundation चा उद्देश शिक्षकांच्या कार्याची दखल घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे तसेच समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे शिक्षकांना योग्य सन्मान व मान्यता मिळेल आणि शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यूट्यूबवर पहा

बदलाचे आवाज

आमच्या मुंबई कार्यक्रमातील मनापासून अनुभव सांगणारे शिक्षक

शिक्षकांचे अनुभव

खऱ्या कथा. खरा प्रभाव.

Be The Change Foundation च्या उपक्रमांमुळे शिक्षकांच्या जीवनात सकारात्मक आणि प्रेरणादायी बदल घडून येत आहेत. या उपक्रमांद्वारे शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी योग्य मार्गदर्शन, सन्मान आणि प्रोत्साहन मिळत आहे. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात शिक्षकांनी आपले अनुभव मांडत संस्थेच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन शैक्षणिक पद्धती अंमलात आणण्यास या उपक्रमांनी त्यांना प्रेरित केले आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे अनेक शिक्षकांनी सांगितले. या अनुभवांमधून शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम, संवेदनशील आणि भविष्योन्मुख बनत असल्याचे स्पष्ट होते.

यूट्यूबवर पहा

सदर छायाचित्रे माहितीस्तव म्हणून पाहवेत

अशाच पद्धतीचा भव्यदिव्य महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२६ घेण्याचा आपल्या संस्थेचा मानस आहे.

📌 राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार २०२६ – प्रस्तावासाठी आवश्यक निकष

उद्योग क्षेत्रात सातत्यपूर्ण व यशस्वी कार्य केलेले असावे.

व्यवसायात नाविन्य, गुणवत्ता व नैतिक मूल्ये जपलेली असावीत.

रोजगारनिर्मिती व स्थानिक विकासात उल्लेखनीय योगदान.

उद्योग क्षेत्रात इतर उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणारे कार्य.

डिजिटलायझेशन, टेक्नॉलॉजी, प्रक्रिया सुधारणा किंवा नवकल्पना राबविलेल्या असाव्यात.

आर्थिक, सामाजिक किंवा औद्योगिक क्षेत्रात मोजता येईल असा सकारात्मक परिणाम.

शासन, उद्योग संघटना किंवा प्रतिष्ठित संस्थांकडून सन्मान / प्रशस्तीपत्रे असल्यास विशेष गुणांकन.

सामाजिक जबाबदारी (CSR), पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास इ. क्षेत्रात योगदान.

उद्योगाच्या माध्यमातून समाजावर सकारात्मक व दीर्घकालीन प्रभाव निर्माण केलेला असावा.

📍 पुरस्काराचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
📅 पुरस्काराची दिनांक : ३१ मे २०२६

राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार २०२६ विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Ans. “बी द चेंज फाउंडेशन” (नोंदणीकृत) तर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार देशातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी दिला जातो.

Ans. भारतातील कोणताही कायदेशीर नोंदणीकृत उद्योग/व्यवसाय करणारा उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, MSME उद्योजक किंवा सामाजिक उद्योजक अर्ज करू शकतो.

Ans. अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या “Apply / Nomination Form” लिंकवर क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरावा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

Ans. होय. ऑफलाईन अर्ज नमुना डाउनलोड करून तो भरून आवश्यक कागदपत्रांसह ई-मेल किंवा पोस्टद्वारे पाठवता येतो.

Ans. उद्योग नोंदणी प्रमाणपत्र, GST/Udyam/MSME सर्टिफिकेट, ओळखपत्र, कार्याचा पुरावा व स्वयं-साक्षांकित कागदपत्रे आवश्यक आहेत.

Ans. सर्व प्रस्तावांची तपासणी “बी द चेंज फाउंडेशन” च्या तज्ज्ञ समितीद्वारे पारदर्शक निकषांवर केली जाईल.

Ans. विजेत्यांना शाल, मानपत्र, आकर्षक ट्रॉफी, डिजिटल सन्मानपत्र व सोशल मीडिया प्रमोशन दिले जाईल.

Ans. नामनिर्देशन शुल्क रु. २५,०००/- इतके आहे.

राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार २०२६


उपस्थित राहणार असणारे मान्यवर

राष्ट्रीय स्तरावरील आदर्श उद्योजक, उद्योगतज्ज्ञ, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर

बी दी चेंज फाउंडेशन अंतर्गत झालेले आमचे इतर उपक्रम

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार – १८ जानेवारी २०२६ - वृत्तपत्र दृष्टीचित्र

Paper Cut 1 Paper Cut 2 Paper Cut 4 Paper Cut 5 Paper Cut 6 Paper Cut 7 Paper Cut 8 Paper Cut 3

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ – वृत्तपत्र दृष्यचित्रं

Paper Cut 1 Paper Cut 2 Paper Cut 3 Paper Cut 4 Paper Cut 5 Paper Cut 6 Paper Cut 7 Paper Cut 8 Paper Cut 9 Paper Cut 10 Paper Cut 11

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ – वृत्तपत्र दृष्यचित्रं

Paper Cut 1 Paper Cut 2 Paper Cut 3 Paper Cut 4 Paper Cut 5 Paper Cut 6 Paper Cut 7 Paper Cut 8 Paper Cut 9 Paper Cut 10 Paper Cut 11 Paper Cut 12 Paper Cut 13

राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार २०२६


आयोजक मंडळ

मा. मयूर ढोकचौळे सर
अध्यक्ष

मा. मयूर ढोकचौळे सर

अध्यक्ष, राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार २०२६

अध्यक्ष, बी द चेंज फाउंडेशन

संचालक, स्केलझेन टेक्नॉलॉजी'ज प्रायव्हेट लिमिटेड

https://scalezen.in/

मयूर ढोकचोळे हे Scalezen Technologies Private Limited या शैक्षणिक सल्लागार कंपनीचे संस्थापक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांचा प्रचंड अनुभव असून, त्यांनी CBSE शाळा, इंग्रजी माध्यम शाळा आणि NDA अकॅडमीमध्ये पाच वर्षे प्राचार्य म्हणून यशस्वी कारकीर्द बजावली आहे.

फक्त एका संस्थेपुरते मर्यादित न राहता, ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचावे या उद्देशाने त्यांनी Scalezen Technologies Pvt. Ltd. ची स्थापना केली. या कंपनीमार्फत ते विविध शाळा, कॉलेजेस आणि NDA/NEET/JEE अकॅडमीसाठी शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन, व्यवस्थापन सुलभीकरण आणि टेक्नॉलॉजी सोल्युशन्स देत आहेत.

ScaleZen ही कंपनी सध्या शाळा, कॉलेजेस, इंजिनिअरिंग आणि मेडिकल महाविद्यालये अशा विविध प्रकारच्या ३० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांमध्ये आपली कन्सल्टन्सी सेवा पुरवत आहे. या सर्व संस्थांमध्ये ScaleZen कंपनी अकॅडेमिक, ऍडमिनीट्रेशन, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, अ‍ॅडमिशन कन्सल्टन्सी, शैक्षणिक धोरण आखणी आणि व्यवस्थापन या क्षेत्रात सल्ला व सेवा पुरवत आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्यात, अभ्यासक्रमानुसार सराव करता यावा यासाठी त्यांनी "परीक्षा पोर्टल" या मोबाइल व वेब ॲपची निर्मिती केली आहे. आज अनेक विद्यार्थी या ॲपचा लाभ घेत असून, त्याचा उपयोग दैनिक सराव, डेली टेस्ट्स, स्टडी मटेरियल आणि निकाल व्यवस्थापनासाठी केला जातो.

"बी. दि. चेंज फाउंडेशन" तर्फे, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी "महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६" या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये राज्यभरातील विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी, उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या उल्लेखनीय, होतकरू आणि प्रेरणादायी कार्याचा सन्मान करण्यात येणार आहे. आपल्या हस्ते या मान्यवरांचा गौरव होणे, हे आमच्यासाठी अभिमानाची बाब ठरेल.

महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते, अधिकारी आणि समाजसेवक यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. अनेकजण निःस्वार्थ भावनेने, समर्पित वृत्तीने आणि नवोन्मेषी दृष्टिकोनातून समाजासाठी कार्यरत आहेत. परंतु असे अनेक व्यक्तिमत्व त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान मिळण्यापासून वंचित राहतात. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, हेच या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

समाज, शासन व जनतेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना योग्य सन्मान देणे आणि त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळवून देणे — हेच "महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६" चे खरे ध्येय आहे. हा उपक्रम म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेरणादायी व्यक्तीसाठी गौरव, प्रेरणा आणि समाजसेवेचा उत्सव आहे.

मा. अभिषेक तुपे सर

उपाध्यक्ष, राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार २०२६

मा. अभिषेक तुपे सर हे "महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६" चे उपाध्यक्ष असून, समाजातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्याच्या या उपक्रमामागील प्रमुख प्रेरणास्त्रोत आहेत. समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना योग्य सन्मान मिळावा, हा त्यांचा ध्येयदृष्टिकोन आहे.

“प्रत्येक क्षेत्रातील समर्पित आणि प्रामाणिक व्यक्तींना त्यांच्या कार्याचा सन्मान मिळालाच पाहिजे,” या विचारावर ठाम राहून तुपे सरांनी समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्तींना ओळख देण्याचा संकल्प केला. त्यांनी "बी द चेंज फाउंडेशन" तर्फे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी "महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६" हा उपक्रम सुरू केला आहे.

तुपे सरांचा हा उपक्रम म्हणजे राज्यातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांसाठी एक प्रेरणास्थान आहे — जो त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करतो, त्यांच्या कार्याला समाजात योग्य प्रतिष्ठा मिळवून देतो आणि इतरांना प्रेरित करतो.

मा. अभिषेक तुपे सर
उपाध्यक्ष

कार्यालयीन पत्ता

बी . द. चेंज फाउंडेशन ( रजि. महा. २२०/२२)

🏢 मुख्य कार्यालय : मुंबई
📍प्रादेशिक कार्यालय : दूसरा मजला, जानकी प्लाझा, भगवान महावीर पथ कोपरगाव,
ता. कोपरगाव, जि. अहमदनगर,
पिन कोड - ४२३६०१
+91 8796696960
+91 9370255617
nationalhealthcareawrad@gmail.com
bethechange.org.in

🙏 धन्यवाद!

तुमचा प्रस्ताव यशस्वीरित्या पाठवला गेला आहे.
आमचा कार्यसंघ लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल.